Nagar : शहाजापूर डोंगर परिसरातील पाणवठ्यांमध्ये सोडले पाणी

पारनेर : पारनेर तालुका पत्रकार संघाच्या ‘वन्यजीव प्राण्यांसाठी एक तास ‘ या उपक्रमांतर्गत पारनेर तालुका पत्रकार संघ व गौरव उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून शहाजापूर डोंगर परिसरातील असलेल्या पाणवठ्यांमध्ये पाच हजार लिटर पाणी पाणवठ्यात सोडण्यात आले.
पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘वन्यजीव प्राण्यांसाठी एक तास’ या उपक्रमांतर्गत गेली पंधरा दिवसांपासून विविध गावांमधील पाणवठ्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी सोडले जात आहे. या उपक्रमामुळे भर उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागण्यास मदत होणार आहे.
या सामाजिक उपक्रमप्रसंगी पारनेर तालुका पत्रकार संघाचे पत्रकार मार्तंडराव बुचडे, पारनेर नगरपंचायत उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, हभप साबळे राघवानंद महाराज, शिवाजी पानमंद, विनोद गोळे,शरद रसाळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर, डॉ.शलाका भालेकर, भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.





