Nagar: भंडारदरा धरणातून आज शेतीसाठी आवर्तन सुटणार

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून उन्हाळी हंगामातील शेतीसाठीचे आवर्तन आज सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे. आमदार हेमंत ओगले यांनी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती.
उन्हाची तीव्रता वाढल्याने शेती पिकांना पाण्याची गरज असून मागील आवर्तनाला जवळपास ४० दिवसांचा कालावधी उलटला असल्याने विहिरींनी देखील तळ गाठल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. भंडारदरा व निळवंडे धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडल्यास निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे आमदार ओगले यांनी म्हटले होते.
आज सुटणारे आवर्तन जवळपास तीन आठवडे चालणार असून, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. याबाबत कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार ओगले यांनी केले. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे आणि जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी देखील यापूर्वी लवकरात लवकर आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.





