Nagar : मुळाचे आवर्तन सोमवारी सुटणार

नेवासा : मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सुरू करण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
ना.विखे यांनी आमदार लंघे यांची ही मागणी लक्षात घेऊन सोमवार (दि.१७) पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. यापूर्वी मुळा उजव्या कालव्याचे रब्बी आवर्तन ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पूर्ण झालेले असून, उन्हाळी आवर्तन १ मार्चपासून सुरू करण्याचे नियोजन झालेले होते.
मात्र, लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याकडे मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी आमदार लंघे यांच्याकडे केली. आ.लंघे यांनी ना.विखे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी करून शेतकऱ्यांना तातडीने मुळाचे आवर्तन सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळेच सोमवार (दि.१७)पासून मुळाचे पाटपाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांतून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
यासंदर्भात ना.विखे पाटील यांनी आवर्तन सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यामुळे आ. विठ्ठलराव लंघे आणि ना. विखे पाटील यांच्या निर्णयाचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केले.





