Nagar : जिल्ह्यात लालपरीची संख्या शंभरने घटली

अहिल्यानगर : सन 2019 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तब्बल 740 बसेस होत्या. मात्र त्यानंतर पाच वर्षात या बसेसच्या संख्येत 120 बसेसची घट झाली. अनेक बसेस स्क्रॅपमध्ये गेल्याने आता 620 बसेसवर जिल्ह्यातील प्रवाशांची मदार आहे. नव्याने 200 बसेस उपलब्ध होणार आहे. पण त्या कधी येणार याची प्रतीक्षा आहे. दरमहिला लालपरीतून तब्बल 75 लाख प्रवाशी प्रवास करीत असून बसेस कमी असल्याने प्रवाशांना बसस्थानकात ताटकळत रहावे लागत आहे.
2019 नंतर बसेसची संख्या घटत आहे. जुन्या बस गाड्या बंद पडण्याचे प्रमाणही त्यात वाढले आहे. जुन्या बसेस असल्याने त्यात 15 वर्षानंतर स्क्रॅपमध्ये जातात. या पाच वर्षात 120 बसेस स्क्रॅपमध्ये गेल्या असून नव्याने बसेस उपलब्ध झाल्या नाही. त्यात महिलांना 50 टक्के तर ज्येष्ठांना मोफत प्रवास असल्याने हे प्रवाशी वाढले आहे. सहाजिक जिल्ह्यासाठी बसेस कमी पडत आहेत. जुन्या बसेस असल्याने त्या बंद पडण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. दिवसाला सुमारे तीन बसेसचे ब्रेक फेल होण्याचे प्रमाण असून या बस गाड्या रस्त्यामध्ये बंद पडत असून प्रवाशांना त्यामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नव्याने 200 बसेस येणार आहे. मात्र जसे उत्पादन होते. त्यानुसार बसेसचा पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात 30 बसेस नव्याने आल्या असून त्यात 10 बसेस तारकपूर आगाला तर उर्वरित 20 बसेस शेवगाव व पाथर्डीला प्रत्येकी 10 बसेस देण्यात आल्या आहेत. सध्या तरी प्रवाशांची संख्या चांगली आहे 86 टक्के प्रवाशी आहेत. दरमहिन्याला सुमारे 75 लाख प्रवाशी प्रवास करीत आहेत. उत्पन्नात कोपरगाव व नेवासा आगार आघाडीवर आहे. या दोन्ही आगारचे उत्पन्न सातत्याने वाढत आहे.
सध्या अहिल्यानगरमधील माळीवाडा, राहुरी, जामखेड या तीन बसस्थानकांची नव्याने उभारणी होत आहे. राहुरी व जामखेडचे काम सुरू असून माळीवाडा बसस्थानकाला अद्यापही महापालिकेची बांधकाम परवानगी मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर लगेच कामाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात 11 डेपांसह 33 बसस्थानक आहेत. तसेच 1 लाख 58 हजार महिला दररोज बसने प्रवास करीत आहे. महिलांना भाड्यामध्ये 50 टक्के सवलत असल्याने एसटीचे भारमान वाढले असल्याचे विभागीय नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
पाच डेपो नफ्यात
दर महिन्याला डेपोंचे भारमान व नफ्याची माहिती घेण्यात येते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील तारकपूर, कोपरगाव, नेवासा, अकोले व श्रीगोंदा हे पाच डेपा नफ्यात असल्याचे दिसून आले आहे.





