Nagar : जन्मभूमी चोंडी ते कर्मभूमी इंदोर एसटी चालू करा : पांडुरंग माने

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती दि. ३१ मे रोजी साजरी होत आहे. यानिमित्त अहिल्यादेवीच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेली जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी असलेली इंदोर ही बस सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागप्रमुख पांडुरंग माने यांनी जिल्हा विभाग वाहतूक नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्याकडे केली. ही बस सेवा पुन्हा चालू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले, त्यामुळे चौंडी-इंदूर असा एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक मार्ग चालू व्हावा.
यामुळे मध्य प्रदेशातील लाखो भाविकांना चौंडी येथे दर्शनासाठी येणे सोपे होईल आणि महाराष्ट्रातील नागरिकांनाही इंदूरकडे प्रवास सोयीचा होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी इंदूर यांना जोडणाऱ्या चौंडी-इंदूर बससेवा चालू करावी, अशी मागणी पाडुरंग माने यांनी वाहतूक नियंत्रक यांच्याकडे केली.





