Nagar : एसटी महामंडळाने प्रवाशी भाडेवाढ मागे घ्यावी

अकोले : अकोलेसारख्या आदिवासी व डोंगराळ भागात अकोले एसटी विभागाकडून प्रवाशी वर्गासाठी वेळेवर बस नसल्याने एसटी महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने प्रवाशी तिकिट भाडेवाढ केल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्य सरकारने भाडेवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायतने केली. या मागणीचे निवेदन तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना दिले आहे.
अकोले तालुक्यात आदिवासी भागासह, सधन भागातही एसटी बसच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत. अनेक विद्यार्थांना वेळेत बस नसल्याने पायी प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, ग्रामस्थ यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बसच्या संख्या कमी आहे. एसटी बस नादुरुस्त असतात. बसच्या काचा फुटलेल्या आहेत.
एसटी महामंडळाकडून बसच्या कोणत्याही सुविधा नसताना १५% भाडेवाढ जाचक असून, ती त्वरीत मागे घ्यावी, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकावर ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेणकर, राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे, रोहित चोथवे , संपत बोऱ्हाडे, सुखदेव वाकचौरे, चंद्रकांत खर्डे, ॲड.बी.एम.नवले, प्रा. डी. एम. चौधरी, आदिवासी पुरस्कार नेते जयराम इदे, दत्ता ताजणे, मच्छिंद्र चौधरी, नरेंद्र देशमुख, सुदाम मंडलिक आदींची नावे आहेत.





