Nagar : शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुखपदी मिराताई खेडकें

श्रीगोंदे : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या श्रीगोंदा महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पदी मिराताई खेडकें यांची तर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी नियुक्ती केली. शिवसेना उपनेते अजय बोरस्तेकर, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव, जिल्हा प्रमुख डॉ शबनम इनामदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविल्यामुळे महाराष्ट्रात शिंदे शिवसेनेमध्ये इन्कमिंग सुरू झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील अनेक पदाधिकार्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असून अनेक जण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्त्या मिराताई खेडकें यांनीही गेले दोन तीन महिन्यापासून शिवसेना महिला आघाडी बरोबर पक्षाचे काम करत होत्या.
पक्षाचे उपनेते अजय बोरस्तेकर सभासद नोंदणी अभियान निरीक्षक म्हणून जिल्हा दौर्यावर आले होते. आहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृह येथे मिराताई खेडकें यांची श्रीगोंदा तालुकाप्रमुखपदी तर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी नियुक्ती केली.





