शिवाजी महाराज जयंतीसाठी जय्यत तयारी

निघोज,(वार्ताहर) – शिवबा संघटना, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी मळगंगा मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी एकत्रित बैठक घेतली. हा उत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी शिवजयंती उत्सव दि.१९ फेब्रुवारी रोजी होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजदरबार प्रतिकृती या मिरवणूकीत दिसली पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ पाटील, शिवबा संघटनेचे संस्थापक अनिल शेटे, अध्यक्ष बबनराव तनपुरे, मुख्य पदाधिकारी राजू लाळगे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे, युवा नेते रवी लंके, मच्छिंद्र लाळगे,
राहुल शेटे, अविनाश लामखडे, मिनीनाथ कवाद, लहू निचीत, विशाल लामखडे, शैलेश लामखडे, ठकाराम गायखे, श्रीकांत लामखडे, आपला गाव गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी रणसिंग आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचे भव्य स्वागत, महाआरती, संध्याकाळी मिरवणूक तसेच व्याखान अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.





