Nagar : मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार

संगमनेर : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहिमेचे (दुसरा टप्पा) उद्घाटन संगमनेर येथील रु.दा. मालपाणी विद्यालय येथे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते संपन्न आले. सदर मोहिमेत ० ते १८ वयोगटातील सर्व शालेय विदयार्थ्याची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार व संदर्भसेवा पुरविण्यात येणार आहे.
ग्रामीण रुग्णालय, संगमनेर कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मोहिमे अंतर्गत आयोजित कार्यक्रमप्रसंगी आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येतील, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड, नगर पालिका शिक्षण विभाग प्रमुख जईद शेख, मालपाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक मच्छिंद्र हापसे तसेच अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.





