नगर: नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाने उडाली शेतकऱ्यांची तारांबळ
Updated On:

नेवासा – नेवासा तालुक्यात आज सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडला. अचानक ढगाळ वातावरण निर्माण होवून थेंब पडू लागल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
अचानक पडणाऱ्या अवकाळी पाऊसामुळे अनेकांचे चांगलेच हाल झाले. पावसाबरोबर ढगांचा कडकडाट आणि वारे वाहत होते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ पाऊस सुरु होता. त्यातच वीजही गायब झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.





