Nagar : सोनई कॉलेज रोडवरील कॅफेवर हाणामारी; सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोनई : सोनई- राहुरी रोड कॉलेज परिसरात असलेल्या द ब्राऊन मग कॅफे येथे हाणामारीची घटना घडली. अजित संजय जाधव (वय 25 रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेज परिसरामध्ये जाधव यांची द ब्राऊन मग कॅफे आहे. जाधव कॅफेमध्ये असताना या ठिकाणी ऋतिक भास्कर दरंदले, सिद्धेश उनवणे, सचिन काकडे (पूर्ण नाव माहिती नाही सोनई) व एक अनोळखी इसम नाव वरील सर्वजण या कॅफेमध्ये बसून होते.
फिर्यादी हा वरील इसमांना म्हणाले की, मला हॉटेल बंद करायचे आहे, वेळ झाली आहे, तुम्ही इथून निघून जा, असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी खिशातून चाॅपर काढून डाव्या कानाच्या पाठीमागे मारल्याने फिर्यादीस दुखापत झाली.
यातील उनवणे याने खाली पडलेला लोखंडी पाईप फिर्यादीच्या डोक्यात मारला. काकडे याने बांबू उचलून डोक्यावर मारला. सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





