Nagar : कर भरण्यासाठी वसुली विभाग सुट्टीच्या दिवशी चालू

श्रीरामपूर : शहरातील सर्व मालमता व नळकनेक्शनधारकांना शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी कर भरणा करण्यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेचे वसुली विभाग चालू ठेवण्यात येत आहे. त्याचा लाभ सर्व मालमत्ता व नळकनेक्शन धारक यांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासक किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.
नगरपरिषदेस देय असणारे घरपट्टी व पाणीपट्टी भरणा मुदतीत न भरल्यास थकीत रकमेवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ नुसार मासिक २% शास्ती (दंड/व्याज) आकारली जाते.
तसेच मार्च महिन्यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी कर भरणा करण्यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेचे वसुली विभाग चालू ठेवण्यात येत आहे.
त्याचा लाभ सर्व मालमत्ता व नळ कनेक्शनधारक यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.





