Nagar : तीर्थक्षेत्र विकासासाठी 43 कोटी निधी मंजूर

अहिल्यानगर : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रासाठी 43 कोटी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहीती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजना महायुती सरकारने जाहीर केली होती. महायुती सरकारने सर्व जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 149 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र विकासातून पर्यटन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी मागील काही वर्षात जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले होते. जिल्ह्यातील महत्वपूर्ण आशा तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तीर्थक्षेत्रांच्या 30 कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्री बिरोबा महाराज देवस्थान परिसराची पर्यटन विकास योजनेंतर्गत सुधारणा व सुशोभिकरण करणासाठी- 4 कोटी 92 लाख, ओझर खुर्द येथील नेमबाई मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी 25 लाख, निंबाळे येथील मोठेबाबा मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी 25 लाख, अंभोरे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी 14.6 लाख, कोल्हेवाडी येथील काशी विश्वेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी 25 लाख, धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर परिसर सुशोभिकरणाठी 19.8 लाख, धांदरफळ खुर्द येथील श्री बिरोबा देवस्थान परिसर सुशोभिकरणासाठी 15 लाख, साकूर येथील श्री विरभद्र देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेट येथील गंगागिरी महाराज संस्थान येथील विकास कामांसाठी 4 कोटी 98 लाख, उंदिरगाव ते श्री क्षेत्र सरलाबेट या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी 5 लाख मंजूर आहेत. जामखेड तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकास कामांसाठी 4 कोटी 13 लाख,श्री.क्षेत्र खर्डा येथील सिताराम बाबा देवस्थान मंदिर सभामंडप व महंत सभा मंडपासाठी 3 लाख, तर पारनेर तालुक्यातील निघोज येथे मळगंगा देवी परिसरात पर्यटन विसावा केंद्र बांधकामासाठी 2.50 लाख, मळगंगा देवी परिसरात पर्यटन भोजन कक्ष बांधकाम करणे व संरक्षण भिंत बांधकामासाठी 1 कोटी 30 लाख, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 ते मंदिर कुंड रस्ता कॉक्रोटीकरणासाठी 65 लाख, निघोज येथील मळगंगा देवी परिसर सुशोभिकरणासाठी55 लाख मंजूर झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील श्रीक्षेत्र दर्शन मंदिर परिसर सुशोभिकरण व सभामंडपासाठी 40.66 लाख, श्री क्षेत्र मोहटादेवी जगदंबा माता येथील घाट दुरुस्तीसह सुधारणा करण्यासाठी 2 कोटी घाटशिरस येथील वृध्देश्वर देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी 49.99 लाख, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर सुशोभिकरण करणे 1 कोटी 50 लाख रूपये या योजनेतून उपलब्ध होणार आहेत.
श्री क्षेत्र मढी ते तिसगाव रस्त्याची सुधारणा कामासाठी 3 कोटी 40 लाख,मोहटा देवी येथे ध्यान धारणा केंद्र व बहुउद्देशिय सभागृह बांधण्यासाठी 55.22 लाख. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी 49.99 लाख आणि राहुरी तालुक्यातील कणगर येथील कनकावती माता मंदिर सभामंडप बांधकामासाठी 35 लाख, म्हैसगाव येथील केदारेश्वर महादेव मंदिर सभामंडप बांधकामासाठी 20 लाख, राहुरी बुद्रुक येथील खंडोबा महाराज मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी 20 लाख, ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबा माता देवस्थान परिसर सुशोभिकरणासाठी 49.66 लाख तसेच अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील अंबिका माता देवस्थान ट्रस्ट येथे सुशोभीकरणासाठी 2 कोटी, कोतुळ येथील कोतुळेश्वर महादेव मंदिर विकासकामांसाठी 1 कोटी 50 लाख तर शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील गणपती मंदिर सभामंडप बांधण्यासाठी 50 लाख मंजूर झाले आहेत.





