नागा चैतन्य बॉलीवूड अभिनेत्रीसोबत झाला स्पॉट; व्हायरल फोटोमुळे रंगल्या डेटींगच्या चर्चा

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala | दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य कायमच त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले. सध्या त्याचे आणखी एका अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शोबिता धुलिपाला आहे. हे दोघेही एकत्र स्पॉट झाल्याने दोघांच्याही डेटींगच्या चर्चा रंगल्या आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला युरोपमध्ये सुट्टी घालवत आहेत. ज्याचचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या फोटोमुळे या दोघांच्या डेटींगच्या बातम्यांना आणखी उधाण आलं आहे. व्हायरल होत असलेल्या शोभिता धुलिपाला किंवा नागा चैतन्यच्या ताज्या फोटोमध्ये ते दोघेही युरोपमध्ये वाईन टेस्टिंग सेशनचा आनंद घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर चाहतेही कमेंट करत आहेत. Naga Chaitanya And Sobhita Dhulipala |
View this post on Instagram
दरम्यान, नागा चैतन्य त्याची पत्नी समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले होते. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी दोन वर्षांहून अधिक काळ डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केलं. मात्र २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा करुन त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला. त्यानंतर आता नागा चैतन्यचे नाव शोबिता धुलिपालासोबत जोडले जात आहे. Naga Chaitanya And Sobhita Dhulipala |
हेही वाचा:
लोकसभेच्या निकालानंतर जाणून घ्या सोन्या चांदीचे ‘लेटेस्ट दर’





