Italian Open 2021 : जोकोविचचा पराभव करत नदालला विजेतेपद
Updated On:

रोम – स्पेनचा क्ले कोर्टचा बादशहा व टेनिसपटू राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात नदालने जोकोविचला 7-5, 1-6, 6-3 असे पराभूत केले. हा सामना तब्बल 2 तास 49 मिनिटे रंगला. आजवर सहा वेळा या दोघांत झालेल्या सहा लढतींमध्ये नदालनेच वर्चस्व राखले आहे.
नदालने या स्पर्धेची 12 व्यांदा अंतिम फेरी गाठताना 10 वे विजेतेपद मिळवले. या विजेतेपदासह नदालने जोकोविचच्या 36 एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपदाशी बरोबरी साधली.





