Tokyo Olympics : मिजाइनची एकाच स्पर्धेत चार पदके
Updated On:

टोकियो -क्यूबाचा अनुभवी कुस्तीपटू मिजाइन लोपेझ याने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ग्रीको-रोमन प्रकारात 130 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
मिजाइनचे हे ऑलिम्पिकमधील चौथे सुवर्णपदक ठरले आहे. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सलग चार सुवर्णपदके पटकावणारा तो पहिलाच पुरुष कुस्तीपटू ठरला आहे.
चार सुवर्णपदके मिळवणारा ऑलिम्पिकच्या इतिहासातील पाचवाच खेळाडू बनला आहे. मिजाइनच्या पूर्वी कार्ल लुउस, अल ऑर्टर, काओरी इचो व मायकेल फेल्प्स यांनीही एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सलग चार सुवर्णपदके जिंकलेली आहेत.





