मुळा धरणात बुडून माय-लेकाचा मृत्यू

राहुरी: रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुळा धरणात दोन पर्यटक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. त्याने आई व तिचा मुलगाचा समावेश आहे. पूजा गणेश सातपुते (वय 37) ओमकार गणेश सातपुते (वय १३) राहणार,बोरुडे मळा, अहमदनगर असे मृतांची नावे आहेत.

सातपुते कुटुंबातील तिघे जण आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिरण्यासाठी म्हणून मुळा धरणाकडे गेले होते. गणेश सातपुते पाण्यात उतरले व गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा ओंकार पुढे गेला. तो पाण्यात बुडू लागला म्हणून त्याची आई मदतीस गेली. परंतु त्यामध्ये पूजा सातपुते व ओंकार सातपूते पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. सायंकाळी रात्री उशीरा त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.