Navneet Rana | पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्याने हिंदूंना टार्गेट केल्याचं सांगत काही अंशी धार्मिक वादही उफाळून समोर आला आहे. अशातच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हिंदुत्त्वाचा एल्गार करत केलेले विधान चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाचे उदाहरण दिले आहे. नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा? ‘पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना कुराण वाचायला सांगितलं. आमच्या बहिणींना वाचता आलं नाही, तेव्हा दहशतवाद्यांनी सगळ्या हिंदूंना आणि मुस्लिमांना एका बाजूला केलं. आमच्या हिंदू भावांनी गोळ्या खालल्या पण कुराण वाचायला ते तयार झाले नाहीत’, असं म्हणत नवनीत राणा यांनी पहलगाममधील घटनेची माहिती दिली. यावरुन त्यांनी पुढे सांगितले की, ‘माझा मुलगा लहान आहे, मी त्याला विचारलं की कुराण वाचणार का? तर तो म्हणतो की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल पण कुराण वाचणार नाही’, असं म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्त्ववादी असल्याचं जाहीर केले. Navneet Rana | ‘मोदीजी भुट्टोला भुट्ट्यासारखं भाजतील’ पाकिस्तानचा भुट्टो सांगतो की, ‘सिंधु नदीचं पाणी थांबवलं तर त्याच नदीत हिंदूंचे रक्त दिसेल, अरे अख्ख्या पाकिस्तानमध्ये भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची ताकद नाही. कारण, भारतात एक वाघ राहतात, ज्याचं नाव नरेंद्र मोदी, अमित शहा आहे. आता पाणी काय तुमचं दाना पण बंद करू. पंतप्रधान मोदी हे भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखं भाजतील… मला मोदीजी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या आयपीएलचा जेवढा खर्च आहे, तितका पाकिस्तानचा जीडीपी आहे’, असंही नवनीता राणा यांनी म्हटले आहे. Navneet Rana | ६ दिवसांत १० दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या ६ दिवसांत १० दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांची घरे स्फोटांद्वारे उडवली जात आहेत. यानंतरही सुरक्षा दलांची ही कारवाई अजूनही सुरू आहे. Navneet Rana | हेही वाचा : पहलगाम हल्ला ! खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा पाकला खुला पाठिंबा ; म्हणाला,”आम्ही २ कोटी शीख”