Subodh Bhave Post : माझी बहीण लढवय्या होती, पण ….; अभिनेता सुबोध भावेंची प्रियासाठी भावनिक पोस्ट

Subodh Bhave Post : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन मनाला चटका लावणारं आहे. तिच्या अकाली एक्झिटने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातून अनेकांनी प्रियाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी पोस्ट लिहून तिच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. मराठी कलाविश्वातील अभिनेता सुबोध भावे याने देखील अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाची भावनिक पोस्ट त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरच निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली, अशी भावनिक पोस्ट अभिनेता सुबोध भावेंनी शेअर केली आहे. या पोस्टसोबत अभिनेत्याने तिच्यासोबचा एक फोटोही शेअर केला आहे.
अभिनेता सुबोध भावेंची भावनिक पोस्ट
प्रिया मराठे ” एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली.
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी प्रियाला कॅन्सरच निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही. ” तू भेटशी नव्याने” या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला.
या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार म्हणून शंतनू मोघे याने भक्कमपणे तिच्यासोबत होता, असं म्हटलं आहे. तसेच माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. ओम शांती. अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावेने केली आहे.
चांगली माणसं देव का नेतो?
दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. कोणी काही बोललं तरी सोडून द्यायचं. त्याचा अपमान करायचा नाही, असा स्वभाव तिचा होता. गोड व्यक्तिमहत्व तिचं होतं. चांगली माणसं देव का नेतो? असा सवाल अभिनेत्री प्राजक्ता माळीने केला आहे. उलट त्रास व्हायला लागलाय खूप. सुदंर काम करत होती आणि मनापासून काम करायची, असंही प्राजक्ताने अभिनेत्री प्रिया मराठेविषय़ी बोलताना सांगितलं.
हेही वाचा : रिंकू राजगुरूचा क्रश कोण? म्हणाली “मराठी इंडस्ट्रीत…”





