प्रभात वृत्तसेवा निमगाव केतकी – भरणे म्हणाले राज्यातील पाच महत्त्वाच्या खात्यामध्ये कृषी खाते आहे व या खात्याची जबाबदारी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर दिल्याने आता माझी जबाबदारी वाढली आहे.नरसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातून मच्छिंद्र चांदणे हे ग्रामीण भागातील गरजू मुलींना दरवर्षी शिक्षणासाठी दत्तक घेतात. त्यांचे हे शैक्षणिक काम प्रेरणादायी आहे व त्यांचा आदर्श इतरांनी घ्या असे मत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले. आज निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने व चंदूकाका सराफ अँड सन्सचे चेअरमन किशोरकुमार शहा, सुवर्णयुगेश्वर पतसंस्था, पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, शशांक यादव, डॉ. अविनाश पाणबुडे यांच्या सहकार्याने विद्यालयातील दत्तक 150 मुला-मुलींना कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वेळी पुण्याचे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, संस्थापक दत्तात्रेय चांदणे, सरपंच प्रवीण डोंगरे, सुवर्णयुग पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे, चंदूकाका सराफचे क्लस्टर मॅनेजर दीपक वाबळे, जाकीर शेख, अॅड. शिवराज माळवदकर, तात्यासाहेब वडापुरे, भीमराव बोराटे, अतुल मिसाळ, प्राचार्य एम. बी. भोंग, उपप्राचार्य छाया मोरे, रहेना मुलाणी, संगीता माळवदकर, अलका चांदणे, शिवानी माळवतकर अमोल मिसाळ, लक्ष्मीकांत जगताप, संदीप भोंग, भानुदास राऊत, कपिल हेगडे, अभिजीत गुरव, रवींद्र शेंडे, किरण जौंजाळ हे उपस्थित होते. प्रास्ताविकात मच्छिंद्र चांदणे म्हणाले, शिक्षणासाठी मुली दत्तक घेण्याचे हे पंधरावे वर्षे असून आता पर्यंत तीन हजाराहून अधिक मुलांनी याचा लाभ घेतला आहे. सर्वश्रेष्ठ रक्तदाता पुरस्कार मिळाल्याबद्दल माणिक ननवरे, वसंतराव नाईक कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णा बनकर व योजनेतून चांगल्या पदापर्यंत पोहोचलेल्या क्रांती चव्हाण यांचा भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन के. डी. भोंग यांनी केले व संजय हेंद्रे यांनी आभार मानले.