रणबीर कपूर म्हणाला,’माझे वडील रागीट होते… ‘

अभिनेता रणबीर कपूर प्रत्येकवेळी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकतो. गेल्या वर्षी त्याच्या ॲनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाने 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आणि सर्वजण रणबीर कपूरचे कौतुक करताना दिसले.
संपूर्ण चित्रपटात त्याने आपल्या व्यक्तिरेखेवर नियंत्रण ठेवले. ॲनिमल हा रणबीरच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रणबीर कामासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
रणबीर कपूर यांचे त्याच्या वडिलांसोबतचे नाते नेहमीच चर्चेत येते. रणबीरचे त्याचे वडील ऋषी कपूर यांच्याशी फारसे मैत्रीपूर्ण नाते नव्हते. अशी चर्चा अनेकदा रंगते. अलीकडेच रणबीरने त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. ‘पीपल विथ डब्ल्यूटीएफ’ पॉडकास्ट दरम्यान, रणबीर कपूरने ऋषी कपूरबद्दल बोलताना त्याच्या स्वभावाविषयी चर्चा केली.
प्रोमोमध्ये रणबीर म्हणतो की,’माझे वडील ‘रागीट’ पण ते एक चांगले व्यक्ती होते. मी वडिलांच्या डोळ्यांचा रंग कधीच पाहिला नाही. मी नेहमी वडिलांसमोर नतमस्तक होतो. ॲनिमलच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्येही रणबीर त्याच्या दिवंगत वडिलांबद्दल बोलला होता. अभिनेत्याने सांगितले होते की,’माझे खूप प्रवास करायचे, त्यामुळे दोघेही मैत्रीपूर्ण संबंध राखू शकले नाहीत.’
रणबीर पुढे म्हणाला ,’मी वडिलांचा खूप आदर करतो, पण त्याच्याशी कधीच मैत्री नाही. ॲनिमल हा चित्रपट रणबीरच्या मनाच्या खूप जवळ आहे. कारण ते त्याच्या कथेशी बरेच काही जोडू शकतात. हा चित्रपट वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित होता, जिथे वडील आपल्या मुलाला वेळ देऊ शकत नाहीत आणि मुलगा आपल्या वडिलांसाठी आसुसलेला दिसतो.’





