लाडक्या बहिणींनो… फक्त एक दिवस बाकी; आजच करा ई-केवायसी, पटापट जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Ladki Bahin Yojana E KYC | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी अनिर्वाय करण्यात आली आहे. यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. उद्या म्हणजेच 31 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ईकेवायसी न केल्यास तुमचा पुढील महिन्याचा हप्ता येणार नाही.
माझी लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. मात्र अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ई-केवायसी करण्याची तारीख 31 डिसेंबरच्या पुढे वाढवण्याची शक्यता असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
शासनाकडून एक महिन्याची मुदतवाढ देऊन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर होती, जी 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. Ladki Bahin Yojana E KYC |
4500 रुपये जमा होण्याचा अंदाज
ऑक्टोबरचा १५०० रुपयांचा हप्ता तीन आणि चार नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता. त्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरची रक्कम मिळालेली नाही. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची रक्कम कधी मिळेल, याची प्रतीक्षा असली तरी त्यासाठी त्यांना आता थेट नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. जानेवारी 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर खात्यात 4500 रुपये जमा होतील असा अंदाज आहे. Ladki Bahin Yojana E KYC |
अशी करा ईकेवायसी-
- ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ‘ई-केवायसी’ निवडा
- नोंदणीकृत मोबाईलवर आपला आधार क्रमांक आणि ओटीपी भरा.
- सर्व माहिती भरा आणि वडील किंवा पती जिवंत असतील तर त्यांचा आधार क्रमांक द्या.
- त्यानंतर जात निवडावी लागेल आणि कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे की नाही हे देखील सांगावे लागेल.
- आता बायोमेट्रिक प्रक्रियेद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
हेही वाचा:





