म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी वाढ, तरीही जगाच्या तुलनेत आपणमागेच (भाग-१)

गेल्या दशकात गुंतवणूक प्रकारात वेगाने प्रचलित झालेला प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड योजना. त्यातही गेलेल्या ५ वर्षात या गुंतवणूक प्रकारात अनेक बदल झाले व त्यामुळेच या प्रकाराशी अनेक सामान्य गुंतवणूकदार जोडले गेले. “सेबी” ने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल घडवून आणले. याचा परिणाम म्हणजे गेल्या ५ वर्षात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत वेगाने झालेला प्रसार. या काळात म्युच्युअल फंड योजनेतील सोपेपणा व कमीत कमी खर्चात योजनेतील नियोजन यावर भर देण्यात आला.

“ऍमफी” या म्युच्युअल फंड असोसिएशनने केलेला प्रचार व प्रसार याचा थेट परिणाम म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांना या गुंतवणूक प्रकाराची ओळख झाली, या योजनांचे असणारे फायदे व तरलता लक्षात आली. टि.व्ही., वृत्तपत्रे व सोशल मिडिया अशा अनेक माध्यमांतून याबाबत सातत्याने लोकांना याची माहिती देण्यात आली.

पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये कमी होत जाणारा परतावा,वाढणारी जोखिम व असुरक्षित वातावरणाचा फायदा म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूक वाढीस झाला. अनेक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोने, जमीन-मालमत्ता व बॅंकेच्या ठेवींतून बाहेर काढून म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये वळवली. ३१ ऑगस्ट २००९ अखेरीस असणारे म्युच्युअल फंडाची एकूण गुंतवणूक रु.७,५७,०००.०० कोटींची होती, ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंत ती गुंतवणूक वाढून रु.१०,१३,००० कोटी झाली व ३१ ऑगस्ट २०१९ अखेर तब्बल रु.२५,६३,९३५ कोटींची झाली आहे. यावरून ही वाढ लक्षात येते.

गेल्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात सामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या योजनांकडे आकर्षित झाले. याचं काळात सरकारने घेतलेले अनेक निर्णय ( नोटबंदी,  जीएसटी इ.) याला कारणीभूत ठरले आहेत. या काळात म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये ४५ % ने वृध्दी झाली. २००९ च्या एकूण गुंतवणूकीच्या २७% गुंतवणूक इक्विटी योजनांमध्ये २०१४ पर्यंत वाढत गेली होती.

म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी वाढ, तरीही जगाच्या तुलनेत आपणमागेच (भाग-२)

२०१४ :- एकूण गुंतवणूक १०,१३,००० कोटी, पैकी २७% इक्विटी योजनांमध्ये

२०१९ :- एकूण गुंतवणूक २५,६३,९३५ कोटी, पैकी ४५% इक्विटी योजनांमध्ये

Leave A Reply

Your email address will not be published.