म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी वाढ, तरीही जगाच्या तुलनेत आपणमागेच (भाग-२)

म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी वाढ, तरीही जगाच्या तुलनेत आपणमागेच (भाग-१)

गेल्या दशकात म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये आलेली गुंतवणूक ३.५ पटीने वाढली आहे. मागील ५ वर्षात सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढविल्याने एकूण गुंतवणूकीमध्ये २.५ पट वृध्दी व एकूण ८.६ कोटी फोलिओपैकी ७.६६ कोटी फोलिओ छोट्या गुंतवणूकदारांचे आहेत.

२०१८ हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत अनिश्चित वातावरणात गेले. अनेक नकारात्मक घटना व बातम्यांचे प्रमाण वाढत गेले, यामुळे बाजारात मोठा चढ उतार होत होता. या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून ३३,०१४ कोटी रुपये काढून घेतले व रोखे बाजारातील ४७,७९५ कोटी रुपये गुंतवणूकीतून काढून घेतले. परंतु याच काळात भारतीय गुंतवणूकदार मात्र सातत्याने म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक वाढवत होते.

जागतिक पातळीवर म्युच्युअल फंडाचा प्रसार मोठया प्रमाणावर झालेला आहे. अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या एकूण गुंतवणूकीच्या ५४% रक्कम म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवली आहे, ब्रिटनमध्ये हेच प्रमाण ४५%, फ्रान्समध्ये हे प्रमाण २५%, जर्मनीमध्ये २१% आहे. चिनी व ब्राझिल मध्ये ही गुंतवणूक १०% जवळ आहे, परंतु भारतात आजही एकूण गुंतवणूकीच्या केवळ ४% गुंतवणूक म्युच्युअल फंडात गुंतवलेली आहे.

मागील आठवड्यात भारत सरकारने कार्पोरेट कर कपातीचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे दि.२० आणि २३ सप्टेंबरमध्ये बीएसई निर्देशांकात जवळपास ३००० आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९०० अंकांनी वृध्दी झाली. या दोन दिवसांत म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनांचा परतावा १० ते १२% ने वाढला. जो बॅंकेच्या ठेवींवरील व्याजाच्या दुप्पट आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)