‘मुस्लिम दुकानदारांनी दुकानांना हिंदू देवतांची नावे देऊ नयेत’, कावड यात्रेपूर्वी उत्तर प्रदेशच्या मंत्राचे वादग्रस्त विधान चर्चेत

uttar pradesh । श्रावण महिन्यात होणाऱ्या कावड यात्रेची तयारी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासन या यात्रेच्या तयारीत व्यस्त आहे. कावड यात्रेपूर्वी उत्तर प्रदेशचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी मुझफ्फरनगरमध्ये कंवर कॅम्प चालकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर कपिलदेव अग्रवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. जे मुस्लिम कावड यात्रेत हिंदू देवी-देवतांच्या नावाने दुकाने चालवतात त्यांनी तसे करू नये. असे कपिलदेव अग्रवाल म्हणाले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता वाद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कावड मेळ्यात मुस्लिम लोक हिंदू देवी-देवतांच्या नावाने दुकाने चालवतात. त्यांनी स्वतःचे दुकान चालवण्यास आमचा आक्षेप नाही पण त्यांनी दुकानाला हिंदू देवदेवतांचे नाव देऊ नये कारण बाहेरून येणारे कावडी तिथे बसून चहा-पाणी पितात आणि त्यांना ही गोष्ट समजल्यावर वाद होतात. त्यामुळे या प्रकरणात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. जेणेकरून नंतर वादाचे कारण बनू नये.
सरकारने दिली ही मार्गदर्शक तत्त्वे
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) प्रशांत कुमार यांनी आगामी कावड यात्रा आणि मोहरमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना वेगवेगळे निर्देश दिले. कंवर यात्रा आणि मोहरम मिरवणूक मार्गांबाबत ते म्हणाले की, ‘डिजिटल स्वयंसेवक आणि नागरी संरक्षण यांच्या मदतीने सुरक्षा योजना तयार करावी.’
कोणत्याही नवीन परंपरेला परवानगी देऊ नये आणि कावड यात्रेचे मार्ग आधीच तपासावेत, असे डीजीपी म्हणाले. याशिवाय, त्यांनी मिश्र लोकसंख्या असलेल्या भागात आणि हॉटस्पॉटमध्ये अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्याचे आदेश दिले. पोलीस महासंचालक म्हणाले कीउपद्रव करणाऱ्या घटकांवर कडक नजर ठेवावी आणि संवेदनशील ठिकाणी अधिक पोलीस तैनात करावेत.
संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवली जाईल
याशिवाय मिरवणूक मार्गांवर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही सक्रिय ठेवण्याचे तसेच रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावरील सुरक्षा वाढविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. झोन सेक्टर योजना राबवून अतिसंवेदनशील ठिकाणी तपासणी वाढवावी, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. डीजीपींना 24 तास इंटरनेट मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही द्याव्यात.





