मुस्लिम पोल्ट्री मालकांनी दलित मुलांना अमानुष मारहाण करत धिंड काढली, उत्तर प्रदेशातील घटनेने खळबळ…

उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातून एक गंभीर आणि निंदनीय घटना समोर आली आहे. तीन दलित मुलांना गहू चोरीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यानंतर या मुलांचे मुंडण करून तोंडावर काळे फासून त्यांची गावभर धिंड काढण्यात आली. या घटनेने समाजातील जातीय अत्याचाराची विक्रुतता पुन्हा एकदा समोर आणली आहे.
मंगळवारी, ताजपूर टेडिया गावात दोन पोल्ट्री मालकांनी १२ ते १४ वर्षांच्या वयोगटातील तीन मुलांना ५ किलो गहू चोरी केल्याचा आरोप करत त्यांना जबर मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलांचे मुंडन करत चेहऱ्यावर काळे फसले, त्यांच्या हातावर ‘चोर’ असे लिहून गावभर धिंड काढण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना नानपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप सिंह यांनी सांगितले की, पीडित मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाझीम खान, कासिम खान, इनायत आणि सानू अशी आरोपींची नवे आहेत. त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सानू हा अद्याप फरार आहे.
पीडित मुलांनी माध्यमांना सांगितले की, आरोपींनी केवळ गहू चोरीचा आरोपच केला नाही, तर जातिवाचक शिवीगाळ करून, त्यांना वायरने गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. गावातील काहींनी सांगितले की, आरोपींनी ही संपूर्ण घटना मोबाईलवर चित्रित केली. या प्रकरणाची गंभीरता ओळखून, पोलिसांनी गावात पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे.





