भोर येथील मुस्लिम बांधवांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली ईद
Updated On:

भोर : आज देशभरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील भोर शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाहवर जाऊन सामूहिक नमाज पठण केले आहे. त्यानंतर भोर शहरातील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत ईद साजरी केली. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचा खर्च देखील त्यांनी उचलला.
रमजान ईदच औचित्य साधून भोरमधील मुस्लिम तरुणांनी लायन्स मूकबधिर विद्यालय येथील मूकबधिर मुलांच्या एका दिवसाचा जेवणाचा खर्च उचलला. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत मळेकर, अहमद खान, कदीर खान तोशिब अत्तार, ताबिराज खान, इम्रान अत्तार, वाहिद शेख, साहिल खान, मोईज शेख, साजिद खान उपस्थित होते.





