Indapur News : भोडणी येथे संगीत विठ्ठल कथा व ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मौजे भोडणी येथील चव्हाण वस्ती येथे,सालाबाद प्रमाणे संगीत विठ्ठल कथा व ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णाजी ताटे तसेच ह.भ.प.दादासाहेब चव्हाण यांच्या हस्ते हरिनामाच्या जयघोषात नुकतीच करण्यात आली.
गोसावी बाबांच्या आशीर्वादाने भोडणी परिसरात गेल्या पंधरा वर्षापासून,संगीत विठ्ठल कथा आयोजन केले जात आहे.यंदाही या कथेला प्रारंभ झाला असून, भागवताचार्य ह.भ.प.केशव भागवत तोडकर महाराज हे कथा प्रवक्ते म्हणून काम सेवा देत आहेत.
या सप्ताहात,ह.भ.प.राजेंद्र खाडे,विजयसिंह कानगुडे,भजनदास महाराज मिसाळ,हरिदास महाराज चव्हाण,विशाल महाराज वाघमारे,राम महाराज अभंग,प्रमोद महाराज शिंदे,दत्तात्रय महाराज बेलकर,दिलीप महाराज पवार,संतोष महाराज मगर,अंकुश महाराज खुरंगे,संगीत विठ्ठल कथेला परिपूर्ण साथ देत आहेत. २७ एप्रिल रोजी,सकाळी दहा ते बारा ह.भ.प.राजू महाराज करडे यांचे काल्याचे किर्तनहोणार असून नंतर महाप्रसाद होणार आहे.अशी माहिती आयोजक दादासाहेब चव्हाण यांनी दिली.





