‘मुसाफ़िर हैं हम भी, मुसाफ़िर हो तुम भी…’; विकी कौशलची खास पोस्ट

Vicky Kaushal | अभिनेता विकी कौशलने अत्यंत कठीण परिेस्थितीचा सामना करत मोठे यश मिळवले आहे. बॉलिवूडच्या दिगग्ज अभिनेत्यांच्या यादीत विकी कौशलचे देखील नाव घेतले जाते. त्याने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाचेही सर्व स्तरातून कौतुक केले जाते. नुकतेच तिने सिनेसृष्टीत दशकपूर्ती झाल्यानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
विकी कौशलने इन्स्टाग्रामवर ‘मसान’ चित्रपटादरम्यानचे काही फोटो शेअर करत लिहिले की, “असं वाटतंय की कालची गोष्ट आहे. पण, दहा वर्षं पूर्ण झाली. अजून खूप काही शिकायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. सर्व गोष्टींसाठी मनापासून आभार”, असं त्याने म्हटलं. यासोबतच त्याने “मुसाफ़िर हैं हम भी, मुसाफ़िर हो तुम भी…किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी” या शायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या या भावनिक पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Vicky Kaushal |
View this post on Instagram
;
विकीने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी विकी ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी सहायक दिग्दर्शक होता. विकीनं अभिनेता म्हणून ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटही केला होता. त्यानंतर ‘मसान’मध्ये साकारलेली त्याची भूमिका अनेकांच्या पसंतीस पडली. Vicky Kaushal |
‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर त्याने ‘सरदार उधम’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘सॅम बहादुर’, ‘छावा’ अशा विविध धाटणीच्या भूमिका त्यानं साकारल्या. आता विकी संजय लीला भन्साळी यांच्या टलव्ह अँड वॉरट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Vicky Kaushal |
हेही वाचा :
काऊंटडाऊन सुरु! ‘बिग बॉस’१९ची पहिली झलक समोर, लोगो बदलला





