पुणे : हडपसर परिसरात सराईताचा कोयत्याने वार करून खून
Updated On:

पुणेः पुर्वीच्या भांडणातून एका सराईताचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. शोेएब मस्जीद शेख (वय.19,रा. भेकराईनगर) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निलेश भाऊसाहेब मेमाने (वय.26) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडे दहा ते पावने अकराच्या सुमारास सासवड रोड भेकराईनगर येथे घडला आहे.





