लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा प्रियकराकडून खून
Updated On:

पुणे -लिव्ह इनमध्ये राहत असताना अल्पवयीन प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करण्यात आला. यानंतर प्रियकर स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला लोणीकंद पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सागर वानखेडे (28, रा. पेरणे फाटा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने भारती अय्यर (17) हिचा खून केला. भारती ही मूळची बुलढाणा येथील आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यामध्ये भांडणे झाली. त्याने रागाच्या भरात गळा आवळून तिचा खून केला. यानंतर स्वत: लोणीकंद पोलीस ठाण्यात येऊन खूनाची माहिती दिली.





