‘मिर्झापूर’मधील मुन्ना भैय्याची साऊथ सिनेमात एन्ट्री

Divyenndu Sharma | अभिनेता दिव्येंदू शर्माने प्राइम व्हिडिओच्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका साकारली होती. त्याचे हे पात्र खूप प्रसिद्ध झाले. आजही तो मुन्ना भैय्या या व्यक्तिरेखामुळेच अधिक करून ओळखला जातो. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तो एका मोठ्या साऊथ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मुन्ना भैय्या तेलुगू चित्रपटात डेब्यू करणार आहे.
मुन्ना भैय्यासोबत यात राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खरं तर या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही, त्यामुळे याला ‘RC 16’ म्हटले जात आहे, म्हणजेच हा राम चरणचा 16 वा चित्रपट आहे. त्यासोबतच या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर देखील दिसणार आहे.
Our Bhayya…
Your Bhayya…
MUNNA BHAYYA!Welcome onboard dear @divyenndu brother 🤍🤗
Let’s rock it💥#RC16 pic.twitter.com/55r3LeAzp7— BuchiBabuSana (@BuchiBabuSana) November 30, 2024
‘RC16’चे दिग्दर्शक बुची बाबू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करून दिव्येंदू शर्माच्या चित्रपटातील एन्ट्रीची घोषणा केली आहे. त्याने दिव्येंदुचा फर्स्ट लूक देखील ट्विटवर शेअर केला आहे. त्याचा या चित्रपटातील लूक खूपच खतरनाक दिसत आहे. बुची बाबू यांनी ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘आमचा भाऊ, तुझा भाऊ, मुन्ना भैय्या. स्वागत दिव्येंदु भाई. चला रॉक करूया.’ ‘RC16’ या चित्रपटात दिव्येंदु शर्मा कोणती भूमिका साकारणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दिव्येंदूला राम चरणसोबत ऑनस्क्रीन पाहणे खूप मनोरंजक असणार आहे. नुकतेच एका छोट्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आणि त्यानंतर पुढील शेड्यूलचे शूटिंग लवकरच हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. जगपती बाबू देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटाचे लेखन सुकुमार यांनी केले आहे. मात्र, आता या चित्रपटात दिव्येंदू कोणत्या भूमिकेत दिसणार हे पहावे लागणार आहे.





