Municipal Elections : कोणत्या महापालिकेसाठी कोण निरीक्षक? राष्ट्रवादीने ‘या’ 7 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

पुणे : महापालिका निवडणुकांची (Municipal Elections) तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एक पाऊल पुढे टाकत महत्त्वाच्या महापालिकांसाठी निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.
कोणत्या महापालिकेसाठी कोण निरीक्षक?
खासदार सुप्रिया सुळे- पुणे महापालिका निवडणूक
अमोल कोल्हे- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक
जितेंद्र आव्हाड- ठाणे महापालिका निवडणूक
जयंत पाटील- सांगली महापालिका निवडणूक
अनिल देशमुख- नागपूर महापालिका निवडणूक
शशिकांत शिंदे- नवी मुंबई महापालिका निवडणूक
अमर काळे- चंद्रपूर महापालिका निवडणूक
जाहीर केलेल्या बहुतांश निरीक्षकांकडे आपापल्या जिल्ह्यातील महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची चाचपणी करण्याची जबाबदारी असेल तर जयंत पाटील यांच्याकडे सांगलीत आघाडीची समीकरणे लक्षात घेऊन गणिते आखण्याची जबाबदारी असेल. याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे भाजपकडून नवी मुंबई महापालिका हिसकावून घेण्याची आणि त्यादृष्टीने आखणी करण्याची जबाबदारी असणार आहे.





