Municipal Elections : महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करा; राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हि रचना झाल्यानंतर निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
कोणत्या महापालिकांची प्रभाग रचना बदलणार ?
राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, अमरावती, अहिल्यानगर,अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी,जळगाव, नांदेड-वाघाळा, या महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे. तर मुंबई महापालिकेची प्रभाग रचना बदलण्यात येणार नाही. मुंबई मध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत.
कोणत्या महापालिकेचा कोणत्या वर्गात समावेश?
अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
ड वर्ग महानगरपालिका – अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना





