Pimpri : दापोडीतील अनधिकृत बांधकामांवर मनपाची कारवाई

पिंपळे गुरव : महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडी येथील बुद्ध विहार व स्मशानभूमी परिसरात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत अनधिकृत पत्राशेड, भंगार दुकाने पाडण्यात आली.
दापोडी येथील बुद्ध विहार व स्मशानभूमी परिसरात ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या अतिक्रमण विभागाचा ताफा सकाळी सात वाजताच धडकला. यावेळी येथील अनधिकृत पत्राशेड, भंगार दुकाने यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. १३ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळात असणारे पत्राशेड, भंगार दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिकेचे उपआयुक्त अतुल पाटील, ह प्रभाग क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये कनिष्ठ अभियंता संदीप हजारे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शुभांगी चंदनकर, प्रफुल्ल भोकरे, विक्रम चव्हाण, रोहन कांबळे, शाबोदिन बागवान, पूजा राठोड, शेषराव अटकोरे व अतिक्रमण निरीक्षक प्रकाश माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
दोन पोकलेन, १० जेसीबी, आठ मनपा मजुर, १० कंत्राटी मजूर, ३८ महाराष्ट्र सुरक्षा बाळाचे जवान, तीन मनपा पोलीस, तीन कॅमेरामन यांच्या सहकार्याने करण्यात आली. कारवाईच्या वेळी दापोडी पोलीस ठाण्यातील बंदोबस्त तैनात होता.





