मुंबईकरांचा आता बेस्टचा प्रवास महागणार; तिकीट दरात किती रुपयांनी वाढ होणार?

Mumbai BEST Price Hike | मुंबईकरांचा आता बेस्टचा प्रवास महागणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे बेस्ट मुंबईत एसी आणि नॉन-एसी बससचे भाडे वाढवण्याचा विचार करत आहे. एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर आता बेस्टच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या भाड्यात 5 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे, तर बेस्टच्या एसी बसचं भाडं 6 रुपयांनी महागणार आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाईल. बेस्ट परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य बेस्ट बसेससाठी किमान भाडे १० रुपये आणि एसी बसेससाठी १२ रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
सध्या, ५ किमी प्रवासासाठी सामान्य बससाठी किमान भाडे ५ रुपये आणि एसी बससाठी ६ रुपये भाडे आकारले जात आहे. आता जर बेस्टने भाडेवाढ केली तर प्रवाशांना दुप्पट पैसे मोजावे लागतील.
बेस्टचे नवे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर. अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या श्रीनिवास यांनी गेल्या आठवड्यात सर्व बस सेवा आणि भाडेवाढीच्या मुद्द्यासह प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला. भविष्यात बेस्टसाठी शाश्वत महसूल मॉडेल म्हणून गरज पडल्यास भाडेवाढीचा विचार आम्ही करू, असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही वाढ
२०१२-१३ पासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बेस्टला आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेकडून ११,३०४ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे. तर, कुल कॅबच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन भाडे वाढ लागू झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. Mumbai BEST Price Hike |
हेही वाचा:
मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कशी केली जाते? ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरून वाद का? वाचा

