Mumbai Vikhroli Slab Collapse । पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. कालच मुंबईत मान्सून दाखल झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर मुंबईतच एक धक्कादायक घटना घडलीय. मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथील टाटा पॉवर हाऊसच्या जागेजवळील कैलाश बिझनेस पार्कमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 10 वर्षांच्या मुलासह 38 वर्षीय पुरुषासह दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आलीय. मुंबईतील विक्रोळी येथे रविवारी रात्री एक मुलगा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलांना जेवण देण्यासाठी गेला होता. त्याच वेळी मुसळधार पावसामुळे स्लॅब कोसळला.या दुर्घटनेत या मुलासह वडिलांचा जागीच मृत्यू झाला. नागेश रेड्डी (38) आणि रोहित रेड्डी (10) अशी मृतांची नावे आहेत. मुसळधार पावसाचा इशारा Mumbai Vikhroli Slab Collapse । भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने सोमवारी पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार, येत्या तीन ते चार तासांत मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन आयएमडीनेही लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विक्रोळी बिझनेस पार्कमधील स्लॅब पडण्याच्या घटनेनंतर मुंबईत सध्या शांतता आहे. यावेळी पाऊसही थांबला आहे. पावसामुळे शहरात अद्यापही पाणी साचल्याचे चित्र दिसत नाही. 10 यापूर्वीही दोन जणांचा मृत्यू झाला होता Mumbai Vikhroli Slab Collapse । 31 मे 2024 रोजी विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर पडल्याने ही घटना घडली. ही इमारत खूप जुनी होती आणि तिची दुरवस्था असल्याने अनेक कुटुंबांनी घरे सोडली होती. तर काही लोक फ्लॅट रिकामे करण्याचा विचार करत होते. हेही वाचा एनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक ; कोणत्या विषयावर होणार चर्चा ? वाचा