Accident News : मोठी बातमी..! ठाकरे गटाच्या खासदाराच्या गाडीचा अपघात
Accident News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कारचा विक्रोळी हायवेवर किरकोळ अपघात झाला.

Accident News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कारचा विक्रोळी हायवेवर किरकोळ अपघात झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी येत असताना ताफ्यातील काही गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. (Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी महामार्गावर ताफ्यातील वाहनांची धडक झाल्यामुळे काही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. अपघातानंतरही संजय दिना पाटील यांनी नियोजित बैठकीला उपस्थिती लावली. (Accident News)
उद्धव ठाकरेंच्या बैठकीला सर्व 9 खासदार उपस्थित
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, पक्षाचे सर्व 9 खासदार बैठकीला उपस्थित होते. त्यापैकी 4 खासदार प्रत्यक्ष, तर 5 खासदार ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले. (Accident News)
प्रत्यक्ष उपस्थित खासदार
संजय दिना पाटील
अरविंद सावंत
अनिल देसाई
राजाभाऊ वाझे
ऑनलाइन सहभागी झालेले खासदार
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाघचौरे
नागेश पाटील आष्टीकर
संजय देशमुख
संजय जाधव
लवकरच उद्धव ठाकरेंची प्रत्यक्ष भेट
संजय राऊत यांनी सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे ऑनलाइन सहभागी झालेल्या पाचही खासदारांची आगामी काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक होणार आहे. पक्षातील सर्व खासदार एकत्र असून भविष्यातही अशा बैठका नियमितपणे घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Accident News)





