मुंबई तिरुपती बाईक राईड.. ‘आदिपुरुष’साठी मराठमोळ्या अतुल गोगावले यांचा कडक स्वॅग

मुंबई – ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी निर्माते तिरुपतीमध्ये एक खास शो करणार असल्याचे समजते. या शोमध्ये चित्रपटातील स्टार्ससह पडद्यामागे काम करणारे सर्व आर्टिस्ट देखील उपस्थित राहणार आहे. निर्माते प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीत. नुकतच आदिपुरुष चित्रपटाचे संगीतकार अजय अतुल यांच्यापैकी अतुल गोगावले या खास सोहळ्यासाठी थेट मुंबई ते तिरुपती असा बाईक राईड प्रवास करून पोहचल्याचे समजते.
‘सैराट’ चित्रपटाने देशभर लोकप्रिय झालेली संगीतकार जोडी अजय-अतुल सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रभास आणि क्रिती सॅनन अभिनीत या चित्रपटाच्या संगीतामुळे ही जोडी चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला उपस्थित राहण्यासाठी संगीत दिग्दर्शक अतुलने मुंबई ते तिरुपती असा बाइकवरून प्रवास करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
#Adipurush Music Director #Atul has Travelled on Bike from Mumbai to Tirupati for attending #AdipurushPreReleaseEvent .
He arrived in Tirupat got grand Welcome by Rebelstar Fans❤️#AdipurushOnJune16th #Prabhas pic.twitter.com/G1G14vPGVS— GSK Media (@GskMedia_PR) June 4, 2023
तिरुपतीला पोहोचल्यानंतर अतुलचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी साऊथ इंडस्ट्रीतील आगळेवेगळे स्वागत पाहून संगीतकार अतुल देखील भारावून गेले. यावेळेसचे त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्यांचं यासाठी कौतुक करत आहेत.
आदिपुरुष हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाने रिलीज पूर्वीच सर्व राईट्स विकून बजेटच्या ऐशी टक्के कमाई देखील केली आहे.





