Mumbai Rain : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; उकाड्यापासून हैराण झालेले मुंबईकरांना मोठा दिलासा
Mumbai Rain : उष्णता आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आजची पहाट अत्यंत सुखद आणि दिलासादायक ठरली.

Mumbai Rain : राज्यात कुठे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहे. तर कुठे तपमानाचा कहर पाहायला मिळत आहे. अशातच आता मुंबईत देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. (Mumbai Rain)
पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, विलेपार्ले, सांताक्रुज या सर्व भागात पहाटे पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापासून मुंबईकर उष्णता आणि उकाड्याने त्रस्त झाले होते. अशातच आता मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून हैराण झालेले मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Rain)
हवामान विभागाकडून पुढील 3 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची दाट शक्यता असून, सोसाट्याचा वारा ताशी 30-40 किमी वेगाने वाहण्याची दाट शक्यता आहे. (Mumbai Rain)
परिणामी मुंबई आणि पालघरमध्ये पाऊस कोळण्याची शक्यता वर्तवण्यात असली असून त्या अनुषंगाने खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहे. (Mumbai Rain)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये रविवारपासून सलग तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. याशिवाय, पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या सरी तर सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Mumbai Rain)
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याने तेथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Mumbai Rain)





