Mumbai News : मुंबईमध्ये मंदिराची तोडफोड; 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईतील (Mumbai News) एका मंदिरात काही जणांनी बळजबरीने प्रवेश करून सुरक्षा रक्षकाला धमकावित तिथे आरती केली. ही घटना शनिवारी संध्याकाळी आरे परिसरातील राम मंदिरात घडली. या प्रकणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai News : मुंबईतील (Mumbai News) एका मंदिरात काही जणांनी बळजबरीने प्रवेश करून सुरक्षा रक्षकाला धमकावित तिथे आरती केली. ही घटना शनिवारी संध्याकाळी आरे परिसरातील राम मंदिरात घडली. या प्रकणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासह विविध कलमांखाली १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरे परिसरातील मारोल चेक नाका येथे असलेल्या लेउवा पाटीदार (Mumbai News) समाज राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त जयेश अंबावी पटेल (४६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमित पाठकने हिंदू रक्षक सेना आणि सकल हिंदू समाजच्या नावाने सोशल मीडियावर काही पोस्ट (Mumbai News) प्रसारित केल्या होत्या. यात त्याने शनिवारी स्थानिक पातळीवरील एका वादग्रस्त विषयाच्या निराकरणासाठी लोकांना मंदिर परिसरात येण्याचे आवाहन केले. या पोस्टनंतर ३० ते ४० जणांचा एक गट मंदिर परिसरात जमा झाला. यावेळी पाठक आणि त्याच्या साथीदारांनी मंदिराचे सुरक्षा रक्षक नंदलाल केवट यांना शिवीगाळ करत धमकी दिली.






