Mumbai News : मुंबईत 3.2 कोटींचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक
पश्चिम उपनगरांमध्ये ३.२८ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन बाळगल्याप्रकरणी (Mumbai News) दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे आलम अली आणि नावेद अशी असून ते दोघेही नालासोपारा येथील रहिवासी आहेत.
Updated On:

Mumbai News : पश्चिम उपनगरांमध्ये ३.२८ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन बाळगल्याप्रकरणी (Mumbai News) दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे आलम अली आणि नावेद अशी असून ते दोघेही नालासोपारा येथील रहिवासी आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री कांदिवलीतील (Mumbai News) खजुरीया रोडवर सापळा रचला आणि या दोघांना अडवले. त्यांच्याकडे ६५१ ग्रॅम अमली पदार्थ, २ लाख रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य सापडले.
जप्त करण्यात आलेल्या मालाचे मूल्य ३.२८ कोटी रुपये इतके आहे. हे अमली पदार्थ कुठून आणले होते आणि ते कोणाला पुरवले जाणार होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या दोघांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (Mumbai News) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






