मुंबई – मुंबईत 21 मार्च रोजी म्हणजे मंगळवारी एकाच दिवसात 16.6 मिमी पावसाची नोंद झाली. 2006 पासून मार्च महिन्यात एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
सांताक्रूझ वेधशाळेत 10 मार्च 2006 रोजी 11.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे परवाचा मुंबईतला पाऊस हा गेल्या 17 वर्षांतील मार्च महिन्यातला एका दिवसातील सर्वाधिक पाऊस ठरला. 1918 सालच्या मार्च महिन्यात मुंबईत 34.3 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
“एके दिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक…” जयंत पाटलांनी व्यक्त केली भीती
मुंबईसाठी मार्चमध्ये पाऊस पडणे ही असामान्य बाब समजली जाते. पश्चिमेकडील वारे आणि अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता यामुळे हा पाऊस पडतो असे सांगितले जाते. या पावसामुळे हवेत थोडा गारवा आल्याने मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला.