IPL 2025 Retention : मुंबई इंडियन्सनं धक्कादायक रिटेन्शन लिस्ट केली जाहीर, रोहित-हार्दिक बाबतीत घेतला मोठा निर्णय….

IPL 2025 Retention List For Mumbai Indians : क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक तासांपासून आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्स टीममध्ये कुणाला रिटेन केलं जाणार? याची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
वास्तविक, मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 साठी रिटेन अर्थात कायम ठेवण्याची यादी जाहीर केली आहे. फ्रँचायझीने एकूण पाच खेळाडूंना कायम ठेवले, ज्यात कर्णधार हार्दिक पांड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या यादीसह मुंबईने रोहित शर्माला सोडण्याच्या अफवेला ब्रेक लावला आहे.
मुंबईने रोहित शर्माला कायम ठेवले. याशिवाय हार्दिक पांड्या हा देखील संघाच्या कायम ठेवण्याच्या यादीचा एक भाग होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सने सर्व कॅप्ड खेळाडूंनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
रिटेन्शन लिस्टमध्ये मुंबईने जसप्रीत बुमराहला सर्वाधिक 18 कोटी रुपये दिले. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला 16.35-16.35 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय रोहित शर्माला 16.30 कोटी रुपये देऊन कायम ठेवण्यात आले. बाकी टिळक वर्मा यांना सर्वात कमी 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले. अशाप्रकारे मुंबईने खेळाडू कायम ठेवण्यासाठी एकूण 75 कोटी रुपये खर्च केले आहेत.
आयपीएल 2025 मध्ये पाच खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर आता मुंबईकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक आहेत. आता मुंबईचा संघ आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 45 कोटी रुपयांसह उतरणार आहे.
𝗥𝗘𝗧𝗔𝗜𝗡𝗘𝗗 💙💙💙💙💙
“We have always believed that the strength of a family lies in its core and this belief has been reinforced during the course of recent events.
We are thrilled that the strong legacy of MI will be carried forward by Jasprit, Surya, Hardik, Rohit and… pic.twitter.com/G70B6DyZhw
— Mumbai Indians (@mipaltan) October 31, 2024
रिटेन खेळाडूंवर मुंबईची प्रतिक्रिया…
मुंबईने कायम ठेवलेल्या खेळाडूंबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की , “”रिटेन (कायम)” त्यात पुढे लिहिले आहे की, “आमचा नेहमीच विश्वास आहे की कुटुंबाची ताकद त्याच्या केंद्रस्थानी असते आणि अलीकडच्या घडामोडींमध्ये हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
IPL 2025 Retention : चेन्नई सुपर किंग्सकडून 5 खेळाडू रिटेन, यादी पाहून चाहत्यांना मिळेल दिलासा…
मुंबईने या खेळाडूंना केलं रिलीज….
डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, टिम डेविड, हार्विक देसाई, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्ज़ी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज , मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना मफाका.





