मुंबई क्रिकेट | संघ निवडीसाठी पोवार यांची धमकी
Updated On:

मुंबई – मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समितीचे सदस्य आनंद याल्विगी यांनी माजी रणजीपटू किरण पोवार यांनी धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
पोवार हे देखील या समितीत असून काही ठरावीक खेळाडूंची संघात निवड करण्यासाठी ही धमकी दिली गेल्याची तक्रार याल्विगी यांनी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत अद्याप पोवार तसेच संघटनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पोवार यांनी गुरुवारी सकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधून मला ठरावीक खेळाडूंचीच संघात निवड व्हावी यासाठी धमकावले. पोवार यांनी माझ्याशी बोलताना वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्हही होती, असे आपल्या तक्रारीत याल्विगी यांनी म्हटले आहे.





