Kudal station: गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांची कोकणाकडे धाव; कुडाळ स्थानकावर गर्दीच गर्दी!
Kudal station : चाकरमान्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानकाबाहेर एसटी बस, टॅक्सी आणि खासगी वाहनांची मोठी गर्दी

Kudal station : लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी रवाना होत असून कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
कोकणकन्या, मांडवी, तुतारी, जनशताब्दीसह विशेष गणेशोत्सव गाड्यांमधून हजारो प्रवासी कुडाळमध्ये दाखल होत आहेत. ट्रेन स्थानकात दाखल होताच बॅगा आणि लहान मुलांसह प्रवाशांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला आहे. चाकरमान्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानकाबाहेर एसटी बस, टॅक्सी आणि खासगी वाहनांचीही मोठी गर्दी झाली आहे.
हेही वाचा:
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा; पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा





