Multibagger Stock: लाखाचे झाले कोटी! 4 वर्षात 10 पट परतावा देणारा शेअर; तुम्ही गुंतवणूक केली का नाही?

Lancer Containers Lines Stock Price : भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्याकाही दिवसांपासून घसरण सुरू आहे. मात्र, एक पेनी स्टॉक असा आहे, ज्याने गुंतवणुकदारांना 4 वर्षात कोट्याधीश बनवले आहे. हा स्टॉक लँसर कंटेनर लाइन्स लिमिटेडटचा आहे. सध्या या शेअरची किंमत 39.45 रुपये आहे. मात्र, 4 वर्षांपूर्वी या शेअरची फक्त 4 रुपये होती. बोनस शेअरमुळे याच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे.
दहापट परतावा
लँसर कंटेनर लाइन्स लिमिटेडटच्या शेअरने मागील 4 वर्षात गुंतवणुकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. 4 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना आतापर्यंत जवळपास 89 लाख रुपये परतावा मिळाला असता. म्हणजेच, अवघ्या 4 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांना कोट्याधीश केले आहे. वर्ष 2018 पासून आतापर्यंत कंपनीने तीन वेळा गुंतवणुकदारांना बोनस शेअर दिले आहेत.
तीनवेळा दिले बोनस शेअर्स
18 डिसेंबर 2020 ला कंपनीच्या एका शेअरची किंमत 4.07 रुपये होती. त्यावेळी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत कंपनीचे 24,570 शेअर्स खरेदी करता आले असते. कंपनीने 2018 पासून गुंतवणुकदारांना तीनदा बोनस शेअर्स देखील दिले आहेत. ऑक्टोबर 2021 आणि सप्टेंबर 2023 मध्ये 2:1 प्रमाणात शेअर्सचे वाटप केले आहे.
जानेवारी 2018 मध्ये देखील कंपनीने प्रत्येकी 5 शेअरमागे गुंतवणूकदारांना 3 शेअर्स बोनस दिले होते. सध्या या स्टॉकची किंमत जवळपास 40 रुपये आहे. म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असता, खरेदी केलेले व बोनस शेअर्सच्या मदतीने यावर 89.55 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळाला असता.
(नोंद- शेअर मार्केट व इतर गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)





