पुणे जिल्हा : मल्टी स्पेशल ग्रामीण रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज
पाबळ , पुणे जिल्हा (प्रतिनिधी) : शासकीय कारभारात राजकारण हा अविभाज्य भाग असतो,परिणामी काही विकासकामे लांबतात यातुनही काही वेळा चमत्कार घडतो आणि राजकारणाचा ही परिणाम आपत्तीतून इष्ट आपतीत बदलतो आणि त्यातून समाजाचा अघटित फायदा होतो.
पाबळ येथे अशाच राजकीय चमत्कारातून कोरोनासारख्या महामारीला तोंड देण्यासाठी एक ग्रामीण रुग्णालय मदतीला आले आहे,राजकीय बदलातून तब्बल सहा वर्षांनी आकाराला आलेले हे रुग्णालय आता,कोरोना केअर युनिट म्हणून या भागातील नागरिकांच्या सेवेला सज्ज झाले आहे. 2014 साली ना.दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते पायाभरणी झालेले रुग्णालय राजकीय बदलामुले निधी अभावी काही काळ रखडले मात्र वळसे पाटील यांनी नेटाने निधी मिळवत अखेर पूर्णत्वाला आणले आणि कोरोना युनिट उभारताना मोठा सहभाग देऊन गेले.
पाबळ शिरूर रस्त्यावर तब्बल सहा एकर परिसरात तीस बेड,10 राखीव बेड, अक्सिजन,व्हेंटिलेटर,4 बाह्य रुग्ण विभाग,शस्त्रक्रिया उभाग,एक्स रे सुविधा,10 निवासी डॉकटर्स साठी निवास व्यवस्था,कर्मचारी निवास या सर्व उच्च दर्जाच्या सुविधा,तसेच नैसर्गिक सुशोभित आवार यासह विद्युत व जनरेटर व्यवस्थेसह चकचकीत स्वच्छता असलेले हे रुग्णालय आता कोरोना रुग्णांसाठी सुरू होत आहे.
नुकतीच शिरूरचे आमदार अशोक बापू पवार यांनी तशा आशयाची माहिती दिली आहे तर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या रुग्णालयाला भेट देऊन पुढील कारवाही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर याहीपेक्षा आपल्या गावात एखाद्या शहरी भागातील रुग्णालयासारखे चकचकीत व सर्व सुविधायुक्त रुग्णालय झाले आहे या आनंदाने ग्रामस्थांमधून मोठा आनन्द व्यक्त केला जात आहे.





