Bhor Assembly Constituency: मुळशीला 15 वर्षांनंतर प्रथमच उमेदवारीची संधी, शंकर मांडेकर यांच्या पाठीशी उभे रहा – वैशाली सणस

पिरंगुट – गेल्या पंधरा वर्षांपासून मुळशी तालुक्याला स्थानिक नेतृत्व मिळत नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शंकर मांडेकर यांच्या रूपाने ही संधी मिळाली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस वैशाली सणस यांनी केले.
आंबेगाव (ता. मुळशी) येथे भोर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्राचारार्थ गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सणस बोलत होत्या. आज भरे, अंबडवेट, सुतारवाडी, कासारआंबोली, उरवडे, आंबेगाव, मारणेवाडी, बोतरवाडी, मुकाईवाडी, भुकुम, भुगाव आणि बावधन येथे मांडेकर यांनी भेटी देत मतदारांशी संवाद साधला.
लाडकी बहीण योजना, किसान योजना अशा अनेक योजना चालू ठेवण्यसाठी मांडेकर यांना विधानसभेत पाठविण्यासाठी महिला व युवतींनी त्यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन वैशाली सणस यांनी केले.
यावेळी शांताराम इंगवले, राजाभाऊ वाघ, गोविंद निकाळजे, किसन नागरे, शंकर पवळे, सचिन मराळे, अमोल शिंदे, शिवाजी ढेबे, नवनाथ चरवड, रोहिदास मारणे, सुनील बलकवडे, तानाजी मारणे, तुषार मारणे, स्वप्नील भेगडे, निखिल मारणे, अलका ववले, निता नागरे, सुनीता रोकडे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीआयचे तालुका अध्यक्ष गोविंद निकाळजे म्हणाले, अधिकाधिक लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. ही आपली जबाबदारी आहे. शंकर मांडेकर म्हणाले, स्वतः उमेदवार आहे ही तालुक्यातील जनतेची भावना आहे. तालुक्याच्या विकासासाठी विधानसभेत हक्काचा प्रतिनिधी पाहिजे. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची ग्वाही देतो.




