Mukund Phansalkar : प्रसिद्ध गायक मुकुंद फळसणकर यांचे निधन

पुणे : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘नक्षत्रांचे देणे’ फेम प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन झाले आहे. मुकुंद फणसळकर यांनी पुण्यातील रुग्णालयातील अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मुकुंद यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. पण अखेर 19 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झी मराठी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून मुकुंद फळसणकर हे घराघरांत पोहचले. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत विश्वालाही मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
सलील कुलकर्णी यांनी शेअर केली पोस्ट
मुकुंद फणसळकर गेला…अतिशय आवडता गायक..एकेक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा…आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने..बोलण्याने भारावून टाकलं होतं…त्यातलं एक महत्त्वाचं नाव ….खूप खूप वाईट वाटलं..प्रीतरंग , साजणवेळा , नॅास्टॅस्जिया …. सगळ्या मैफिली डोळ्यासमोर आल्या..एका गुणी आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.. अशी पोस्ट करत सलील कुलकर्णी यांनी दुःख व्यक्त केले आहे.





